TOD Marathi

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच नवाब मलिक यांच्यावर देखील जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता समीर यांच्या समर्थनार्थ काही संघटना समोर येत आहे.

समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ एनसीबी कार्यालयाबाहेर आज शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते जमले. यावेळी त्यांनी समीर यांना पाठिंबा दर्शवित घोषणाबाजी केल्या. समीर हे आज आपल्या कार्यालयात जात असताना शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच त्यांच्यावर फुले देखील उधळण्यात आली.

शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, समीर वीनखेडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही नवाब मलिक यांचा निषेध करतो. युवा पिढीला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय. त्याला साथ दिली पाहिजे, समीर वानखेडे तुम्ही आरोपांकडे दुर्लक्ष करा. ड्रग्ज रॅकेटचा पदार्फाश करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत.