TOD Marathi

नवी दिल्ली : हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.

मशिदीच्या पायऱ्यांखाली हिंदू देवी- देवतांच्या मूर्त्या पुरल्या आहेत. त्यामुळं जागेचं खोदकाम करुन त्या मूर्त्या बाहेर काढण्यात याव्यात, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

तसेच खानजहां बहादुरने जोधपूरमधील हिंदू मंदिरांमध्ये लूटमार केली. शेकडो वाहनांमध्ये ती संपत्ती भरुन तो औरंगजेब समोर आला. त्यावेळी औरंगजेब त्याच्यावर खुश होऊन त्यातील मौल्यवान वस्तु आपल्या तिजोरीत ठेवण्याचे आदेश दिले.

हिंदू देवी- देवतांच्या मू्र्त्या दिल्लीतील जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरुन टाकण्याचे आदेश दिल्याचा दावाही पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे.