टिओडी मराठी, डोंबिवली, दि. 28 जुलै 2021 – यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. याचा महापुराचा महाडमधील १५० प्राण्यांना फटका बसला आहे. तर डोंबिवलीकर यांनी प्राणिमात्रांची मदत केली आहे. कोकणातील चिपळूण, महाड पुरात मनुष्याप्रमाणेच मुक्या प्राण्याचीही वाताहात झाली. त्यातही अनेक प्राणी दगावली आहेत. महाडधील पुराचे पाणी आता ओसरत आहे.
येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झालाय. यात बहुतांश प्राण्यांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जाते, असे पॉझ म्हणजेच प्लान्ट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनीही त्यांच्या संस्थेचे पथक मदत करण्यासाठी सज्ज ठेवून आतापर्यंत १५० प्राण्यांना त्यांनी मदतकार्य केलं आहे.
महाड, पाली, लोनेरे, माणगाव आणि इतर शहरातील संस्था या ठिकाणी कार्यरत असून प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था महाडमध्ये औषधांचा साठा पुरवत आहेत. विशेषतः प्राण्यांसाठी औषधं, साहित्याचा साठा पाठवला जात आहे, असे हि त्यांनी सांगितले.
मुंबई, डोंबिवली तसेच कल्याण परिसरातील प्राणी मित्रांकडून मदत मिळवली जातेय. यात ३०० किलो डॉग फूड, ५० किलो कॅट फूड, घोड्यांचे खाद्य तारपेलिन शिट्स, प्राथमिक उपचारांसाठी लागणारे साहित्य म्हणजेच डेटॉल, अडीच किलो हळद, बेटादिन, कॉटन, सलाईन आणि इतर लागणारी औषधे जमा करून मागील आठवड्यापासून पाठवण्यास सुरूवात केली आहे.
सोमवारी इतर संस्थेकडून पुन्हा एकदा साहित्य आणि औषधांचा साठा पाठवला आहे. तसेच, पॉज संस्थेने दुसऱ्यांदा औषधांचा साठा पुरवलाय. तर, गुरुवारी पुन्हा एकदा औषधांचा साठा महाडमध्ये पाठवला जा णार आहे, असे भणगे यांनी सांगितले.
डोंबिवलीतील पॉझ संस्थेचे कार्यकर्ते महाड या ठिकाणी मदतकार्य करताहेत. आजारी प्राण्यांना औषधोपचार केला जात आहे. प्राण्यांना वेळेवर उपचार मिळावेत, त्यासाठी वेगवेगळ्या भागात शिबीरं लावले आहेत.
प्राण्यांचे लसीकरणावर भर :
या काळात भटक्या प्राण्यांमुळे कोणतीही रोगराई पसरू नये, म्हणून पॉज तर्फ़े सेवन इन वनचे लसीकरणकेले असून पहिल्या दिवशी १५० भटक्या कुत्र्यांना लस दिली आहे. तसेच ठिकाणी रेबीज लसीकरण केल्याचे संस्थेचे टीम सदस्य प्रशांत बुन्नावार यांनी सांगितले आहे.