TOD Marathi

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानबाजार  ही मराठी वेबसिरीज चांगलीच धुमाकूळ घालत आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित बोल्ड भूमिकेत दिसत आहेत.या सिरीजच्या ट्रेलरपासून  अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नेटकऱ्यांनी जबरदस्त ट्रोल केलं आहे. मात्र दुसरीकडं तिचं कौतुक देखील होत आहे. मुळात कौतुक हे झालं पाहिजे कारण आतापर्यंत आपण मराठी अभिनेत्री म्हणजे एक विशिष्ट चित्र समोर घेऊन चालत आलो आहे. तेजस्विनीने देखील रानाबाजार या सिरीजमध्ये बोल्ड भूमिका साकारून मराठी अभिनेत्री कुठेच मागे नसल्याचे दाखवून दिलं आहे.

प्रत्येकवेळी ती नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करत असते. रानबाजरमध्ये बोल्ड़ भूमिका साकारून तिनं तिचं वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. अशा या बोल्ड बेबला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…