TOD Marathi

‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूडमधील गयिका कनिका कपूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
सध्या बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वार वाहत आहेत.‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूडमधील गयिका कनिका कपूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

कनिका कपूर 20 मे रोजी तिचा मंगेतर गौतमसोबत लग्न करणार आहे. कनिका कपूरचे हे दुसरे लग्न असेल. कनिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कनिकाच्या हळदीनंतर आता तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटोज समोर आले आहेत.

कनिका कपूरच्या मेहंदी सोहळ्याची छायाचित्रे खूपच स्वप्नवत आहेत. कनिकाने तिच्या मेहंदीच्या दिवशी थीमशी फिकट हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात कनिका कपूर खूपच सुंदर दिसत होती. त्याच्या मंगेतरने क्रीम रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. कनिकाने फुलांचे दागिने देखील परिधान केले होते.

लंडनमध्ये कनिकाचा मेहंदी सोहळा पार पडला.
मेहंदी सोहळ्यातील खास क्षण…

कनिकाचे हे दुसरं लग्न आहे. कनिका-गौतमवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.