TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 9 ऑगस्ट 2021 – गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सातवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकर पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. सफाई कर्मचारी, पहारेकरी या पदासाठी ही भरती असणार आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

पद –

  • सफाई कर्मचारी (Sweeper)
  • पहारेकरी (watchman)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
सफाई कर्मचारी (Sweeper) – सातवी पास असावे.
पहारेकरी (watchman) – सातवी पास असावे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया, सिव्हील लाईन, प्रशासकीय इमारतीच्या बाजूला, गोंदिया, राज्य – महाराष्ट्र.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 13 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

या पदभरतीसाठी https://districts.ecourts.gov.in/gondia या वेबसाईटला भेट द्या.