टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 सप्टेंबर 2021 – कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 84 दिवसांऐवजी 28 दिवसांनीच द्यावा , असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिलेत. जर परदेशात जाणाऱ्या लोकांना 84 दिवसांच्या आत दुसरा डोस दिला जात आहे. मग, रोजगार आणि शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱयांना दुसरा डोस वेळीच का दिला जात नाही?, असा सवाल न्यायालयाने केंद्राला करीत हे निर्देश दिलेत.
केरळातील कायटेक्स गारमेंट्स कंपनीने आपल्या 5 हजारांहून अधिक कामगारांना दुसरा डोस देण्यासाठी 93 लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी केलीय. मात्र, केंद्राच्या सध्याच्या नियमांमुळे कंपनी कामगारांना दुसरा डोस देऊ शकले नाहीत.
त्यामुळे कंपनीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली. कंपनीच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करताना न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार यांनी केंद्र सरकारला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत निर्देश दिलेत.
लोक कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवडय़ांनी दुसरा डोस घेऊ शकतील, या अनुषंगाने केंद्राने को-विन पोर्टलमध्ये आवश्यक तो बदल करावा, तशा पद्धतीने स्लॉट निवडण्याची व्यवस्था करावी.
सध्याच्या नियमांनुसार, केंद्र आणि राज्य सरकार परदेशात जाणाऱ्या लोकांना 84 दिवसांच्या फरकाने कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी परवानगी देतात. हा समान हक्क रोजगार आणि शिक्षणासाठी वेळीच दुसरा डोस घेऊ इच्छिणाऱयांना का दिला जाऊ शकत नाही?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका धडकी भरवत असतानाच या विषाणूवरील नव्या रामबाण औषधाची खूशखबर मिळाली आहे. हेटेरो कंपनीच्या ‘टोसिरा’ जेनेरिक औषधाचा कोरोना रुग्णांवर आपत्कालीन वापर करण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजुरी दिलीय.