टिओडी मराठी, दि. 14 जून 2021 – सॅमसंग भारतात 21 जून रोजी M-सीरीजचा Galaxy M32 हा फोन लाँच करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या फोनच्या लाँच डेटची माहिती अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून समोर आलीय. अमेझॉनवरील माइक्रोसाइटमध्ये फोनच्या लाँचव्यतिरिक्त स्पेसिफिकेशन आणि डिजाइन दिली आहेत.
21 जून रोजी Samsung Galaxy M32 दुपारी 12 PM वाजता भारतात लाँच होणार आहे. लाँच झाल्यावर फोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
Galaxy M32 मध्ये यू-शेप नॉच मिळेल. फोनच्या मागे चौरसाकृती क्वाड कॅमेरा सेटअप व एलईडी फ्लॅश आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर पावर बटणमधे फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे.
गॅलेक्सी M32 च्या अमेझॉन लिस्टिंगवरून असे समजले आहे कि, यात 6.4-इंचाची AMOLED स्क्रीन आहे, जी FHD + रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे.
गॅलेक्सी M32 मध्ये 6,000mAh ची बॅटरी येईल. या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून या फोनच्या मागील बाजूस 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे.
रिपोर्ट्सनुसार, गॅलेक्सी एम 32 मीडियाटेक हीलियो जी 85 प्रोसेसरवर काम करेल. फोन 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, हा फोन वन युआयसह अँड्रॉइड 11 ओएसवर चालणार आहे.