मुंबई : मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सोबत असलेल्या शिवसेनेच्या १४ आमदारांच्या निलंबनाची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. (Action to be taken on 14 MLA of Shivsena) यानुसार या १४ आमदारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आमदार आदित्य ठाकरे यांना यामध्ये नोटीस पाठवण्यात आली नाही. (Aaditya Thackeray) यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या १४ आमदारांची आमदारकी धोक्यात आली आहे. पक्षाने काढलेला व्हिप न बजावल्यामुळे त्यांच्यावर आता विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यताही आहे.
महाराष्ट्रातील नवीन सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची निवड जिंकली आणि फ्लोर टेस्ट परीक्षाही उत्तीर्ण केली. विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडली. तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी प्रतोद सुनील प्रभू यांनीही व्हीप जारी करत विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश जारी केला होता. (Sunil Prabhu)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमानुसार कारवाई होणार असल्याचे संकेत दिल होते. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. (PC of Ekanath Shinde and Devendra Fadnavis) यावेळी त्यांना उद्धव ठाकरे गटातील १५ आमदारांवर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे यांनी नियमानुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले होते.
मात्र, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना अपात्रतेची नोटीस बजावली नाही. याबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आता आमदार आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. काल फ्लोर टेस्ट पूर्वी शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला होता.