TOD Marathi

औरंगाबाद :
शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. काँग्रेसचे औरंगाबादचे नेते सचिन तायडे (Sachin Tayade) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. औरंगाबाद येथील काँग्रेस नेते असलेले सचिन तायडे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती धरला आहे.

मातोश्रीवर मराठवाड्यातील दोन नेत्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यात ताकद वाढणार आहे आणि त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार आहे.

काँग्रेसचे नेते सचिन तायडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले. सोबतच राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील धांडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुनिल धांडे हे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.