मुंबईत परळ भागात पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूलाच महानगर पाईपलाईन गॅस गळतीमुळे (Fire in Parel area of Mumbai because of gas leakage) आग लागली होती. जमिनीत असलेल्या पाईपलाईनमध्ये ही आग लागली होती. अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केल्या गेले. (Fire brigade) आग लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील दुकानांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. हा संपूर्ण परिसर अतिशय रहदारीचा आहे आणि आग लागल्याने परिसरात मोठा धूरही निर्माण झाला होता.
काही कालावधीनंतर ही आग पूर्णतः नियंत्रणात आली, मात्र अशा प्रकारच्या दुर्घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. अतिशय गजबजलेला हा परिसर आहे, आजूबाजूला शाळा आहेत, दुकान आहेत. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.