TOD Marathi

अंधेरीत सिनेमाच्या सेटला भीषण आग

संबंधित बातम्या

No Post Found

मुंबईत अंधेरी परिसरात एका चित्रपटाच्या सेटला भीषण आग लागली (A Huge Fire Broke Out On The Set Of A Film In Andheri Area) असून अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी आहेत. डी एन नगर मधील चित्रकूट मैदानातील सिनेमाच्या सेटला आग लागली आहे.

आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

सिनेमाच्या सेटमधील बहुतांश सामान ज्वलनशील असल्याने आग वेगानं पसरली आहे.
आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला असून सध्या त्या सेटवर किती लोक अडकले आहेत, किती जणांची सुटका करण्यात आली आहे, ही माहिती समोर आलेली नाही.