TOD Marathi

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य शासनानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्याच्या घोषणेवर फडणवीस बोलत होते.

फडणवीस ट्विटरवर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे, इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो.

त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे.
स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

तसेच प्रत्यक्षात त हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला असल्याचंही फडणवीसांनी म्हणलं आहे.