टिओडी मराठी, अमरावती, दि. 15 ऑगस्ट 2021 – अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव जवळच्या शिराळा इथं कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरलेत.
रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून रेल्वे रुळाचे चाव्या (फिश प्लेट) काढण्यात आले होते, त्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तविलाय.
बडनेरा, अमरावती इथल्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झालाय. नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने रविवारी नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस रद्द केली आहे. तर, जयपूर -सिकंदराबाद एक्स्प्रेस दुसऱ्या मार्गाने वळविली आहे.
बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील डवरगाव इथल्या सोफिया औषनिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा मालगाडीने नेला जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते.
मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा इथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळावरून घसरले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी ८ ते १० तास लागणार आहे, असे सांगितले जात आहे.