धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला (Dhondi Champya Ek Prem Katha trailer released recently) असून यात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित (Directed by Dnyanesh Bhalekar) या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण (Bharat Jadhav, Vaibhav Mangle, Saili Patil, Nikhil Chavan) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणीबरोबरच ओवी -आदित्यची प्रेमकहाणीही खुलताना दिसणार आहे.
आपण एका मुला मुलीची प्रेम कथा तर नेहमीच बघत आलो आहे, परंतु ही कहाणी एका रेडा आणि म्हशीची म्हणजे धोंडी आणि चंप्याची असून या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी लपलेली आहे ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची(Sayali and Nikhil As Ovi and Aditya). या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले. हे दोघं एकाच गावचे असून दोघामध्ये कसलं तरी शत्रुत्व असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचे खटके उडताना दिसत आहेत. आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, की शत्रुत्व जिंकणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबर सिनेमा गृहात जाऊन चित्रपट बघावा लागेल.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, “प्रेक्षकांना विनोदी चित्रपट आवडतात. ही एक धमाकेदार कहाणी आहे. निव्वळ मनोरंजन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासोबत पाहावा असा आहे. धोंडी आणि चंप्याला एकत्र आणताना उडणारी धमाल यात पाहायला मिळणार असून प्रेमकथा आणि विनोद हे दोन्ही जॉनर अनुभवायला मिळतील. या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले हे हास्यसम्राट एकत्र आले आहेत.”
रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित ‘धोंडी चंप्या – एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन बनवण्यात आला (Presented by Reliance Entertainment in Collaboration with Sunil Jain and Cult Digital, the Film ‘Dhondi Champya – Ek Prem Katha’ Produced by Fifth Dimension and Cult Digital is inspired by the story of Prabhakar Bhogle) असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत (Story, Screenplay, Dialogues are by Dyanesh Bhalekar and Sagar Kesarkar). सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत(Sunil Jain, Aditya Joshi, Venessa Roy, Aditya Shashtri are the producers and Amit Awasthi, Sushant Vengurlekar are the co-producers). येत्या १६ डिसेंबर रोजी ‘धोंडी चंप्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात भेटायला येणार आहेत(Dhondi Champya is releasing on 16 december).