TOD Marathi

द्वारका : हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचं दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 99 व्या वर्षी नरसिंगपूर येथे अखेरचा श्वास घेतला. द्वारका आणि तिरमट या दोन मठांचे स्वरूपानंद शंकराचार्य होते.

मध्य प्रदेशात शिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात त्यांचा जन्म झाला होता आणि वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांनी धार्मिक कार्यासाठी घराचा त्याग केला. विशेष म्हणजे स्वतंत्र लढत भाग घेऊन शंकराचार्यांना काही दिवस तुरुंगवासही भोगाव लागला होता. राम मंदिराच्या उभारणीसाठी ही त्यांनी कायदेशीर लढाई लढली होती. काही दिवसांपूर्वी स्वामीजींचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळेस काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेतेही त्यांच्या या वाढदिवसाला उपस्थित राहिले होते. नरसिंहपुर जिल्ह्यातील परमहंस गंगा आश्रमात त्यांनी आज दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.