TOD Marathi

पुणे : राज्यातील नव्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 40 दिवसांनी पार पडला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे गटातून केवळ 9 लोकांनाच संधी मिळाल्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. (9 people of BJP and People of Shinde Group Took Oath as Minister) काहिंनी आपली नाराजी जाहिर बोलून देखील दाखवली.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना संधी मिळेल असं आश्वासन शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलं आहे.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारात ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू आणि आमदार संजय शिरसाठ यांना स्थान न दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. (Bacchu Kadu and Sanjay Shirsat) त्याचबरोबर बच्चू कडू यांनी आपली नाराजी माध्यमासमोर जाहिर बोलून दाखवली होती. त्यानंतर आम्ही त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करू, त्यांचा पुढील मंत्रिमंडळ विस्तारात विचार केला जाईल असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत.