TOD Marathi

नवी दिल्ली : कोरोनानं मागील तीन वर्षापासून जगभरात धुमाकूळ धातला. विकसीत देशांसोबत भारतासारख्या देशातही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक नागरीकांनी पुरेशा वैद्यकीय उपचारांअभावी आपला जीव गमवावा लागला. मात्र सरकार अन् प्रशासनानंही युद्धपातळीवर लसिकरणाला वेग दिला. आता सरकराच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात 548 दिवसांमध्ये कोरोना लसीचे 200 कोटीहून डोस देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. केवळ 18 महिन्यांमध्ये भारताने 200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. मांडविया यांनी सांगितंल की, भारताने फक्त 18 महिन्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 200 कोटीहून अधिक डोस दिले आहेत.

 

देशव्यापी लसीकरणाचा 200 कोटी लसींचा टप्पा ओलांडल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन या नव्या विक्रमाबद्धल जनतेचं अभिनंदन केलं आहे. कोरोनाविरुद्धच्या जागतीक लढाईला भारताच्या या यशानं नवं बळ मिळेल. तसेच याकामात योगदान दिलेल्या सर्वांचं त्यांनी मनापासून आभारही मानले आहेत.