TOD Marathi

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या गांधी परिवाराची ईडी चौकशी सुरू आहे. दरम्यान देशात काँग्रेस वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा इशाराही दिलाय. (Congress Protest in Delhi)

तर या आंदोलनाबद्दल कॉंग्रेस ऑफिसच्या बाहेरही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.

तर प्रियंका गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस मुख्यालय ते पंतप्रधान निवास असा मोर्चा काढणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या ईडी चौकशीवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आपण पंतप्रधान मोदींना घाबरत नाही आणि धमकावून आपला आवाज दाबला जाऊ शकणार नाही असं राहुल गांधी म्हणाले होते.

ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतलं नॅशनल हेराल्ड (National Herald)  कार्यालयातील यंग इंडिया कंपनीचा परिसर सील केला आहे. तर काँग्रसने दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांचं मुख्यालय आणि सोनिया गांधी, राहुल गांधीच्या घराभोवती वेढा घातला आहे.