काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Congress delegation met Uddhav Thackeray, Sharad Pawar) यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. (H. K. Patil, Ashok Chavan, Balasaheb Thorat, Bhai Jagtap)
काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो यात्रा’ राहुल गांधींचे नेतृत्वात कन्याकुमारी ते जम्मू असा 3500 किलोमीटरचा प्रवास करत आहे. (Bharat Jodo Yatra in leadership of Rahul Gandhi) दिवाळीनंतर काही दिवसात ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. जवळपास एक महिन्याचा प्रवास या यात्रेचा पूर्ण झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि नेते सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रात ही यात्रा आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या यात्रेत सहभागी व्हावे ही विनंती करण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
शरद पवार यांनी यापूर्वीच भारत जोडो यात्रेबद्दल भाष्य केलं होतं. 2 ऑक्टोबरला मुंबईत प्रतिकात्मक भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती, यामध्ये काँग्रेससह अन्य पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी देखील होते. त्याचप्रमाणे ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर या यात्रेत जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावेत, असा प्रयत्न काँग्रेस पक्षाचा आहे. आणि याच निमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांचीही भेट घेतली. त्यामुळे आता काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार जाणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.