TOD Marathi

नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्ससाठी अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना कुस्ती खेळात महिला गटामध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी सहा कुस्तीपटूंची निवड कऱण्यात आली आहे. कॉमनवेल्थ गेम्स यंदा इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.

भारतीय कुस्तीपटू पूजा गेहलोतचं (50 किलो वजनी गट), विनेश फोगट (53 किलो गट), अंशू मलिक (57 किलो), साक्षी मलिक (62 किलो), दिव्या काकरन (68 किलो) आणि पूजा धांडा (76 किलो) यांची नावं काॅमनवेल्थ गेमसाठी निवडण्यात आली आहेत.

दरम्यान मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली.