TOD Marathi

Eknath Shinde Delhi Tour : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका टिप्पण्या करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्टातील राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार सांगितले जात आहे. या दौऱ्यासाठी शिंदे आणि इतर दोन मंत्री उद्या दुपारी दिल्लीत दाखल होणार असून, या दौऱ्यादरम्यान ते गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचं आहेत. दौऱ्यादरम्यान शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदेंसोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात नेमकी काय खलबतं शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.दिल्लीतील या भेटीदरम्यान राज्यातील अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या तीन मंत्र्याशिवाय संदीपान भूमरे देखील दिल्लीला जाणार आहेत.

राज्याच्या विकासासाठी केंद्रातर्फे आवश्यक मदत हवी आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे