TOD Marathi

राज्यात नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडेना. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Devendra Fadnavis Delhi Tour) यांच्या पाच ते सहा दिल्ली वाऱ्या झाल्या. यामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे हे दिल्ली दौरे झाले, पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.

सरकारमध्ये केवळ दोनच मंत्री आहेत, एक दुजे के लिए असं सरकार सुरू आहे, अशी टीकाही वारंवार विरोधी पक्षाकडून करण्यात येते. राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. कुठल्याही जिल्ह्याला अजूनपर्यंत पालकमंत्री नेमलेले नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील केली होती. (Ajit Pawar, Balasaheb Thorat criticized government)

मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रीपदाची यादी निश्चित करण्याकरिता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत का? की आणखी काही कारण हे गुलदस्त्यात आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणीही होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा नक्की कशासाठी? हे कळू शकले नसलं तरी मंत्रीमंडळ विस्तार, दोन्ही बाजूंना होणारं खातेवाटप कोर्टात होणारी सुनावणी यासाठी दिल्ली दौरा असण्याची शक्यता आहे.