माझे कुटुंब माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले, अजून जे काही राहिले आहे तेही जातील, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray) यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
पुढे त्यांनी सांगितलं की, एखादा माणूस खूप घाबरला की मनातली भीती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भीती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करतात.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात अडीच वर्ष सूड भावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला, आजही ते सुधारलेले दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे (Uddhav Thackeray accepted the thought of Congress and NCP) अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सुडबुद्धीचे राजकारण हे फार काळ टिकणार नाही. अशी देखील प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.