TOD Marathi

24 तासांपूर्वी राज्यात कुठे कोणते मंत्री ध्वजारोहण करणार याची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीनुसार कोल्हापूरमध्ये 15 ऑगस्ट ला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. मात्र आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. (Minister Chandrakant Patil will hoist flag in Kolhapur) एका रात्रीत हा निर्णय बदलण्यात आला आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशात चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार होते, कोल्हापूरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र आता पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ध्वजारोहण करतील आणि चंद्रकांत पाटील कोल्हापूर मध्ये ध्वजारोहण करतील. (Governor Bhagatsingh Koshyari will hoist flag in Pune)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार? हा प्रश्न होताच. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे हा प्रश्न आणखीन चर्चेत होता. मात्र, अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 19 ठिकाणी कोणते मंत्री ध्वजारोहण करतील ते जिल्हानिहाय मंत्री आणि ज्या ठिकाणी मंत्री नसतील त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने माहिती देण्यात आली आहे.