टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 जुलै 2021 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी सीबीएसई 12 वीचा निकाल 2021 जाहीर झाला आहे. यंदा सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37 टक्के लागला असून यंदा 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मुलींनी मुलांपेक्षा उत्तम कामगिरी केलीय. मुलींचा निकाल 99.67 टक्के आहे, तर मुलांचा निकाल 99.13 टक्के इतका आहे.
मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 0.54 इतकी आहे. 70,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेत. त्यासह यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळालेत.
इयत्ता दहावी, अकरावी आणि पूर्व-बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले आहे. दहावी बोर्ड परीक्षेच्या आधारावर 30 टक्के गुण दिले आहेत.
पुढील 30 टक्के गुण 11 व्या इयत्तेच्या आधारावर व 40 टक्के गुण 12 वीच्या युनिट, मध्यावधी परीक्षा आणि पूर्व बोर्ड परीक्षांच्या आधारावर दिले जात आहेत.
99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण –
यंदा 14,30,188 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी नियमित विद्यार्थ्यांची संख्या 13,04,561 आहे, ज्याचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12,96,318 इतकी आहे. 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
- जाणून घ्या, विविध संस्थेचा निकाल :
1. JNV- 99.94 टक्के
2. KV – 100 टक्के
3. CTSA – 100 टक्के
4. सरकारी – 99.72 टक्के
5. सरकारी सहायता प्राप्त – 99.48 टक्के
6. स्वतंत्र – 99.22 टक्के
सुप्रीम कोर्टाने खासगी विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली –
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) खासगी, पत्रव्यवहार व अन्य कंपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी 12 वीच्या शारीरिक / ऑफलाईन परीक्षा घेण्यास परवानगी देणाऱ्या 22 जूनच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळून लावलीय.
न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर व न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने म्हंटलं आहे की, कोणतीही बाब पुनरावलोकनासाठी तयार केली जात नाही.
- येथे पहा निकाल :
- results.gov.in
- cbseresults.nic.in
- Digilocker.gov.in
- DigiLocker App
- UMANG App
- cbse.gov.in