TOD Marathi

टिओडी मराठी, लखनौ, दि. 9 ऑगस्ट 2021 – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन चक्क भाजपच्या एका नेत्याने केले आहे. एवढेच नव्हे तर, ते कायदे मागे घेतले जातील, असे भाकीत केलं आहे.

उत्तरप्रदेश भाजप कार्यकारिणीचे सदस्य रामइक्‍बाल सिंह यांनी रविवारी रात्री बलियात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यावेळी विविध मुद्‌द्‌यांवर त्यांनी भूमिका मांडली. आणि स्वपक्षाचीच गोची केली.

शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांचा रोष आणि उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन नरेंद्र मोदी सरकार कृषी कायदे मागे घेईल, असेही भाकीत त्यांनी केलं आहे.

कृषी कायद्यांविरोधातील निदर्शनांमुळे भाजप नेत्यांना उत्तरप्रदेशातील काही गावांमध्ये जाणे अवघड झाले आहे. पुढील काळामध्ये पक्षाच्या नेत्यांना शेतकरी घेरावही घालतील. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

त्यात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील शेतकरी सहभागी झालेत. उत्तरप्रदेशा राज्यात पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका सत्तारूढ भाजपला बसणार आहे, असे दिसून येत आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.