TOD Marathi

औरंगाबाद : पालिकेची सोडत जाहीर झाली नसली तरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. म्हणून सर्वच पक्षांनी आता शहरात राजकीय डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शहरात आता शिवसेना आणि मनसेकडून पोस्टर वॉर सुरू करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. मात्र त्या आधीच आता शहरात पोस्टर वॉर सुरू झालं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जेव्हा औरंगाबादेत सभा पार पडली होती तेव्हाही शहरात “होय हे संभाजी नगरच” अशा स्वरूपाचे बॅनर पाहायला मिळत होते. आताही शिवसेनेकडून अशा आशयाचे बॅनर लावण्यात आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच दंग झालं “शेतकऱ्यांचा कैवारी सर्वांना पडणार भारी होय हे संभाजी नगरच…” असे बॅनर्स आता शिवसेनेकडून शहरात लावण्यात आले आहे.

दरम्यान आठ जून रोजी औरंगाबाद शहरात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. औरंगाबादेतून उद्धव उद्धव ठाकरे मनसे आणि ओवेसींना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेले आहे.