TOD Marathi

आयुर्वेदाचार्य Balaji Tambe यांचे पुण्यात निधन

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पुणे, दि. 10 ऑगस्ट 2021 – आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये मंगळवारी निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. मागील आठवड्यात तांबे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं.

उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. ते उपचाराला प्रतिसाद देईना, असे डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी अनेक वर्षं ते कार्यरत होते. विविध वृत्तपत्र, मासिकं आणि इतर माध्यमांतून या विषयातलं प्रबोधन करत होते. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर शेकडो लेख लिहिले आहेत. आयुर्वैदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केलं आहे.

आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीत यांची सांगड घालून आयुष्य आरोग्यपूर्ण बनवता येतं. हा संदेश ते गेली 5 दशकं देत होते. शास्त्रोक्त आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वैदिक औषधांच्या निर्मितीतही त्यांचे योगदान मोलाचं मानलं जातं.

आयुर्वैदाचा त्यांनी भारतासह भारताबाहेरही प्रचार तसेच प्रसार केला. आपल्या वक्तृत्व शैलीचा उपयोग करून त्यांनी आयुर्वेदाची महती जगातील अनेक देशांमध्ये पोहोचवली.

मुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली –

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केलाय. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि दररोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज