TOD Marathi

बॉलिवूडमधील स्टार किड्स नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चाही रंगतात. शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) नेहमी खूप चर्चेत असतो. कधी त्याच्या स्टाईलमुळे तर कधी ड्रग्स मॅटरमुळे. आता पुन्हा एकदा आर्यन खान (Aryan Khan) चर्चेत आला आहे. अलीकडेच आर्यन खान माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit’s) ‘माजा मा’ (Maja Ma) चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये दिसला होता. यावेळी तो बहिण सुहाना खानसोबत आला होता. या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आर्यन खान (Aryan Khan) व्हाइट पुलओव्हर आणि जीन्समध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन धमाकेदार एन्ट्री घेतो आणि समोर उभ्या असलेल्या अनन्या पांडे कडे दुर्लक्ष करून निघून जातो. हिरव्या रंगाच्या चमकदार लेहेंग्यात अनन्या अतिशय सुंदर स्टाईलमध्ये उभी आहे.

आर्यन खानच्या या व्हिडिओवर एक यूजर मजेशीर कमेंट करत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आर्यनने दुर्लक्ष केले आहे.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, त्याने अनन्या पांडेकडे (Ananya Pandey) किती वाईट पद्धतीने दुर्लक्ष केले. अशाप्रकारे अनन्या पांडेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चाहते भरपूर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.