TOD Marathi

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना झटका देणारा निर्णय शिवडी कोर्टाने दिला आहे. (Sanjay Raut Arrest warrant) किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनुसार संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. (Medha Somayya filed complaint against Sanjay Raut) काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख संजय राऊत यांनी केला होता.

या आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेले होते. अखेर कोर्टाने अटंक वारंट जारी केले आहे. यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले, अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी न्यायालयात केली होती. त्यानंतर कोर्टाने राऊत यांना समन्सही बजावले होते. राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना आता या प्रकरणावर काय कारवाई होते हे पहावे लागेल.