TOD Marathi

मुंबई: नुकताच ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तिघंही एका वेगळ्या अंदाजात एकत्र पोज देताना दिसतायेत. तिचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या लक्षात येताच. युजर्सनी आराध्या बच्चनला तिच्या हेअर स्टाइलबद्दल तिला टोमणे मारायला सुरुवात केली.
बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी मुंबईवरुन रवाना झाली आहे. यासोबतच तिचा पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन एअरपोर्टवर दिसले. तिघांनीही फोटोग्राफर्ससमोर एकत्र फोटो क्लिक केले. कान्स फेस्टिव्हल 2022 ला उपस्थित राहिल्याबद्दल चाहते ऐश्वर्या रायचं अभिनंदन करत आहेत. तर दुसरीकडे ट्रोलर्सनी तिची लाडकी मुलगी आराध्याला विनाकारण टार्गेट केलं आहे. काही लोकांनी आराध्याच्या हेअरस्टाइलबद्दल ट्रोल करायला सुरुवात केली. आराध्यावर कमेंट करत लोकांनी आराध्या बच्चनला ट्रोल केलं आहे.