TOD Marathi

अमृता फडणवीस या जगातील सगळ्यात जुन्या असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवासात सहभागी होणार आहेत. यासाठी त्या कान्समध्ये दाखल झाल्या आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकार यांनीही कान्समध्ये हजेरी लावली आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अमृता फडणवीस यांनी कान्समध्ये पोहोचल्याची माहिती स्वतः ट्विट करून दिलेली आहे. सध्या त्यांचं हे ट्विट खूप व्हायरल होत असून फोटो शेअर करताना “कान्समध्ये पोहोचले कान्स चित्रपट महोत्सव 2022 साठी आणि बेटर वर्ल्ड साठी” असं कॅप्शन त्यांनी त्या फोटोला दिलेलं आहे.

जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सव 17 ते 28 मे या कालावधी दरम्यान होत आहे. या चित्रपट महोत्सवात सहा मराठी चित्रपटांचा देखील समावेश आहे.