सध्या विरोधक चांगलेच भडकलेले दिसत आहेत. याचं कारण ठरतयं ते म्हणजे लोकसभेतून खासदारांचं होत असलेले निलंबन. आज पुन्हा एकदा लोकसभेत 49 खासदारांच निलंबन केल आहे. कालपर्यंत 92 अशी निलंबित केलेल्या खासदारांची सख्या होती. ती आज 141 पर्यंत गेल्याचं पहायला मिळत आहे.
संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.
यावर प्रतिक्रिया देताना वृत्तवाहिनींशी बोलताना सुळे म्हणाल्या “सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली. आमचं सरकार होतं, त्यावेळी आम्ही कधीचं असं केले नाही. गृहमंत्र्यांनी संसदेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन द्यावे, त्यावर चर्चा व्हायला हवी आहे. पण सरकारला चर्चा करायची नाही, दडपशाही सुरू आहे”