TOD Marathi

बॉलिवूड मध्ये खिलाडी कुमार म्हणुन ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ (Rakshabandhan) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र याआधीच अक्षय कुमारने (Akshay Kumar) एका नव्या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. अक्षय कुमार जसवंत गिलच्या भूमिकेत दिसणार आहे .खाण अभियंता जसवंत गिल यांच्या जीवनावर आधारित ‘कॅप्सूल गिल’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार जसवंत गिलची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये अक्षयसोबत परिणीती चोप्रा (Parineti Chopra) देखील दिसणार आहे. ‘केसरी’नंतर प्रेक्षकांना अक्षय आणि परिणीतीची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पूजा एन्टरटेन्मेंट आणि अजय कपूरच्या कायता प्रॉडक्शन करत आहेत.

अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘कॅप्सूल गिल’ (Capsule Gill)या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. दरम्यान, ‘कॅप्सूल गिल’ च्या सेटवरील अक्षय कुमारचा लूक लीक झाला आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये अक्षय कुमार सरदारासारखा पगडी आणि चष्मा घातलेला दिसत आहे. या लूकमध्ये त्याला ओळखणे कठीण होत आहे. त्याच्या या नव्या लूकचे फोटोही चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.