पुणे: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांनी महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. पुण्यातील शाळा आणि कॉलेज एक फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितल आहे.
मात्र पहिली ते आठवीची शाळा चारच तास आणि नववीच्या पुढे पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्याचे आदेश पवार यांनी यावेळी दिले आहेत. तर एका आठवड्यानंतर पुण्यातील शाळा पूर्णवेळ भरवल्या जाणार आहेत. मात्र मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? याचा अंतिम निर्णय पालकांनी घ्यायचा अस ही अजित पवार म्हणले आहेत.
मास्क वापरन बंधनकारक असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क मुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं, अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
नागपूरमधल्या गेल्या काही दिवसातल्या पॉझिटिव्हिटी रेटवर बोट ठेवत, कोरोनाची परिस्थिती पाहूनच पुढचं अधिवेशन कुठे घ्यायचं ? याचा निर्णय घेतला जाईल असे ही उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत. या बैठकीत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना, संप मागे घेण्याचा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर सरकारवर टीका करणाऱ्यांना, वाईन आणि दारूमधला फरक ओळखला पाहिजे! असं म्हणत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिल आहे. तर महाराष्ट्राला मद्यराष्ट्र असा शब्द वापरून संभ्रम निर्माण करणं चुकीचं असल्याचं ही अजित पवार या बैठकीत म्हणाले आहेत.