राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अजित पवार यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच लक्षणं दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करण्याचं आवाहनही केलं आहे. (Deputy CM Ajit Pawar tested covid positive)
अजित पवार म्हणाले,
“काल मी करोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी.”
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील करोना संसर्ग झाला होता. (Earlier Governor BhagatSingh Koshyari and CM Uddhav Thackeray tested covid positive) उद्धव ठाकरे मातोश्रीवरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत तर भगतसिंग कोश्यारी यांना अलीकडे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.