TOD Marathi

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार नेते वसंत मोरे ( Vasant More ) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे वसंत मोरे मनसे सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress) किंवा शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश घेणार का? अशी चर्चा सुरू होती.

काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांची एका कार्यक्रमात मनसे नेते वसंत मोरे यांच्याशी भेट झाली होती. मात्र वसंत मोरे आणि संजय राऊतांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. संजय राऊतांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुकही केलं होतं. त्यामुळे वसंत मोरे शिवबंधन बांधणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण त्यांनी प्रत्येक वेळी आपण मनसेतच असल्याचे सांगत सर्वं चर्चा धुडकावून लावल्या होत्या.

या सगळ्या पक्षांतराच्या चर्चा सुरु असताना वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीची ऑफर आल्याचं मान्य केलं आहे. पुण्यातील एका लग्न समारंभात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका विवाहसोहळ्यात वसंत मोरे यांना अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडून वसंत मोरे यांना अशा पद्धतीने हो ऑफर आली आहे(Vasant More has received a yes offer from NCP senior leader Ajit Pawar )

त्यामुळे पुन्हा एकदा मनसेचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही अजित पवारांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्यासाठी गळ घातल्याच्या चर्चा सुरू होत्या.

दरम्यान, मनसेने भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेला वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर मनसेच्या वतीने त्यांच्याकडून शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले होते. पुढे वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर काही वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे यांची भेट देखील झाली होती, तेव्हा आपण मनसेतच आहोत आणि मनसेतच राहणार आहोत असे स्पष्टीकरणही वसंत मोरे यांनी दिला होता. मात्र, असं असलं तरी पुढच्या काळात या सगळ्या भेटीगाठींमध्ये काय नवं चित्र दिसते हे पाहणं औत्सुकत्याचं ठरणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज