TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 3 ऑगस्ट 2021 – जम्मू कश्मीरच्या कठुआमध्ये मंगळवारी सकाळी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. कठुआ येथील रणजीत सागर धरणाच्या कालव्यानजीक हेलिकॉफ्टर कोसळले आहे. या घटनेनंतर बचावकार्य सुरू केले आहे. तसेच हलिकॉप्टरमध्ये कितीजण होते?, याबाबतची माहिती घेतली जात आहे. अद्याप या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही.

भारतीय हवाई दलाचे 254 आर्मी एव्हीएन स्क्वॉर्डन या हेलिकॉप्टरने मंगळवारी सकाळी 10.20 मिनिटांनी मामुन कँट येथून उ्डडाण केलं होतं. हे हेलिकॉप्टर रणजीत सागर धरणाच्या क्षेत्रात कमी उंचीवरून उड्डाण करत होते.

त्यावेळी धरणाच्या कालव्यानजीक ते अचानक कोसळले. या घटनेची माहिती मिळता बचावकार्य सुरू केले आहे. या घटनास्थळी एडीआरएफच्या पथकाला पाठवले आहे. तसेच धरण व कालव्यात शोधमाहीम राबवण्यात येत आहे.

या दुर्घटनेच्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये कितीजण होते. दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे किती नुकसान झाले आहे?, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याबाबतची माहिती घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.