राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी पिकांचे नुकसान झालं आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे तातडीने करण्यात येत आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाच्या वतीने लवकरात लवकर करण्यात येईल. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते.
शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली असून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचीही माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याची माहितीही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.