मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.
आदित्य ठाकरे यावेळेस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात अंतिम झाला होता. परंतु शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा वेदांत समूहाने केली आहे. या गोष्टीमुळे धक्का बसलाय
तसेच मागील काही वर्षापासून सेमी कंडक्टरचा (Semi conductor) तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणी आल्या होत्या. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरात मध्ये सुरू करण्याची घोषणा केली.
वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो. pic.twitter.com/ipBwOWLKvW
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
आदित्य ठाकरे यांनी वेदांत समूहाचे अनिल अग्रवाल यांच्या ट्विचे स्क्रीनशॉट शेअर करत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचं श्रेय घेता आलं नसतं. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.