राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 24 तासात माफी मागा, असा अल्टिमेटम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील केला आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी मांडली आहे.
मुंबईमध्ये आणि मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलनं करण्यात आले आहेत. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा निषेध करण्यात आला आहे. प्रामुख्याने मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण (Vidya Chavan), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, अदिती नलावडे यांनी आंदोलन केलं आणि अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.
हे आंदोलन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी ही भाषा नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आग्रही मागणी विद्या चव्हाण यांच्यासह उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.
दरम्यान, यावर विविध पक्षाच्या महिल्या नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने महिलाबद्दल आदरयुक्तपणे टीका केली पाहिजे पाहिजे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. अब्दुल सत्तार यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचं असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. (Deepali Sayed on statement of Abdul Sattar) तर अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द माघे घेऊन माफी मागितली पाहिजे असेही दिपाली सय्यद म्हणाल्या आहे. यावर बोलतांना भाजपच्या महीला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अब्दुल सत्तारच नाही तर कोणत्याही नेत्याने अशाप्रकारे वक्तव्य करू नयेत असे चित्र वाघ म्हणाल्या. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काही ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहे