TOD Marathi

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रे देण्यासाठी वेळ दिला होता, त्याप्रमाणे ठाकरे गटाने आपली कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दोनच्या पूर्वी सोपवली. त्यानंतर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. दोन्ही गटाची कागदपत्र मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाची चार ते पाच तास मोठी बैठक पार पडली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवलं (Election Commission freezed Shivsena Party Symbol) आणि हे चिन्ह आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट किंवा एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गट अशा दोघांनाही वापरता येणार नाही. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला आहे, शिंदे गटाने मात्र आपला उमेदवार या निवडणुकीत दिला नाही. त्यामुळे या निर्णयाच्या शिंदे गटावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र शिवसेना पक्षचिन्ह गोठवल्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलं आहे. (Aaditya Thackeray tweeted after EC freezed Shivsena Party Symbol)

काय आहे आदित्य ठाकरेंचं ट्विट ?

“खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!”

खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.

लढणार आणि जिंकणारच!

आम्ही सत्याच्या बाजूने!

सत्यमेव जयते! pic.twitter.com/MSBoLR9UT5

— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांनी खोकेवाले म्हणत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. सोमवारी यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे देखील पाहणे औत्सुकत्याचे ठरेल.