सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोंची चर्चाही कायम होत असते. साराचे मराठमोळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरले आहेत. निळ्या रंगाची साडी नेसून साजश्रुंगार करून सारा तेंडुलकर नटून थटून हातात कलश घेऊन उभी असल्याचं दिसत आहे. साराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पारंपारिक आणि मराठमोठ्या अंदाजात तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर गळ्यात सुंदर साज असा साराने लूक केला आहे. तिच्या या लूकसमोर बाकीचे फोटो फारच फिके पडल्याचं दिसत आहे. सारा तेंडुलकरचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला. मिळालेल्या माहितीनुसार सारा तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर एका लग्न सोहळ्यात गेले होते. तिथे सारा करवली म्हणून असल्याचं तिच्या या फोटोंमधून दिसत आहे. कुटुंबातील या सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि साराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.