अभिनेता गोविंदा आणि चंकी पांडे यांचा 1993 साली प्रदर्शित झालेला ‘आंखे’ सिनेमा तुम्हाला देखील आठवत असेल. सिनेमाने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. जबरदस्त कॉमेडी आणि एकापेक्षा एक गाण्यांमुळे सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा प्रस्थापित केली. सिनेमातील एका गाण्यावर आजही चाहते थिरकतात, ते गाणं म्हणजे ‘ओ लाल दुप्पटे वाली तेरा नाम तो बता’… हे गाणं अभिनेत्री रितू शिवपुरी , रागेश्वरी लुम्बा यांच्यावर चित्रित करण्यात आलं. सिनेमात रितू आणि गोविंदाच्या केमिस्ट्रीची तुफान चर्चा झाली.
सिनेमात झकल्यानंतर रितूची फिल्मी कारकीर्द खूप उंची गाठेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. रितू ‘आंखे’ सिनेमानंतर, ‘आर या पार’, ‘रॉक डान्सर’, ‘ग्लॅमर गर्ल’, ‘हद कर दी आपने’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली परंतु यश न मिळाल्याने तिने बॉलिवूडपासून दूर राहिली. मीडियारिपोर्टनुसार, रितूने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करिअर केलं आणि नाव कमावलं. रितू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जिथे ती तिच्या डिझाइन केलेल्या ज्वेलरी शो केस करत असते. आज प्रत्येकाला जाणून आश्चर्य वाटेल की, आंखे सिनेमा रिलीज होऊन 29 वर्षे उलटून गेली आहेत, परंतु असं असून रितू आजही प्रचंड ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते