पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जूनला देहूत येणार आहेत.त्यांच्या हस्ते जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.
आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू भेटीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,
“महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण.
इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी हे दिनांक १४ जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत !”
महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण
इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण !॥ जय जय रामकृष्णहरि ॥ pic.twitter.com/iMLiCNWdPv
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) May 22, 2022