TOD Marathi

पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये, वय वर्ष 71 यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती.
भारतीय रेल्वेतील तज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती. तसेच मेट्रो प्रकल्पासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. लिमये यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आणि भाऊ असा परिवार आहे.मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणा बाबत दोन दिवसापूर्वी महामेट्रोने घेतलेल्या बैठकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील डोंगराळ भागात रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण कसे करता येईल, तसेच पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण कसे असावे, याबाबतही आराखडे त्यांनी तयार केले होते.लिमये यांनी आपले प्राथामिक शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय आणि सीओपी महाविद्यालयाल प्रवेश घेता. पुढे मुंबई आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते भारतीय रेल्वेत दाखल झाले. रेल्वेत विविध ठिकाणी जबाबदारी पार पाडल्यानंतर विभागीय व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले.