मुंबई: विविध पक्षांच्या सभा झाल्यानंतर शिवसेनेची बीकेसी मैदान मुंबई येथे सभा पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार करत असताना महागाई, केंद्राची सुरक्षा, राज्यात सुरू असलेलं राजकारण, राम मंदिर, हनुमान चालिसा, भोंगा यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. काहींना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, भगव्या शाली अंगावर घेऊन फिरतात असं म्हणत यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे,
◆ उत्तरसभा घेऊन महागाईवर जनतेला उत्तर दया.
◆ देवेंद्रजी, तुम्ही असतात तर बाबरी तुमच्या वजनानी पडली असती.
◆ आम्ही उघडपणे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो, लपुन नाही.
◆ संयम बाळगतोय म्हणजे आम्ही नामर्दाची अवलाद नाही.
◆ काहींना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, भगव्या शाली अंगावर घेऊन फिरतात.
◆ आमच्या सरकारने मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला, हे आमचं हिंदुत्व.
◆ राज्यातील मंदिरांचं जीर्णोद्धार करण्याचे काम करण्यात पुरातत्व विभाग आडकाठी आणतय.
◆ मुंबई, मराठी माणसाची अडवणूक केंद्रातून केली जात आहे.
◆ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होत आहे. बुलेट ट्रेनने इथून कोणीही बाहेर जाणार नाही मात्र बाहेरचे लोक इथे येतील.
◆ केंद्र सरकार नको त्या लोकांना सुरक्षा पुरवत आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना सुरक्षा पुरवली जात नाही.
◆ भाजपचे हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे.
◆ महाराष्ट्र मेलेल्या आईचं दुध प्यायलेला नाही.
◆ केंद्रीय यंत्रणांच्या आडून धरपकड बंद करा नाहीतर पळता भुई थोडी होईल.
◆ आमचे हिंदुत्व हे घर पेटवणार नाही तर घरातील चूल पेटवणार असलं पाहिजे.
◆ विरोधकांना वाटत होतं सरकार आता पडेल, पुढे पडेल, एक वर्षानी पडेल. दोन वर्षे पिकलेले आंबे पडले मात्र सरकार नाही.
◆ उज्वला योजनेचे बारा वाजले, सिलेंडर एक हजार रुपयांच्या पुढे.
◆ हनुमान चालीसा, प्रार्थना आमच्या हृदयात.
◆ काही लोकं टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेतात.
अशा पद्धतीने शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाच्या या सभेत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्दे मांडले.