भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका कार्यालयात धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणा संबंधात आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी सोमय्या यांनी माध्यमाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी मिलीभगत करुन जीव घेण्याचा कट रचला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलताना केला.
सोबतच सोमय्या म्हणाले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सरकारचे घोटाळे मी वारंवार बाहेर काडू लागलो त्यामुळेच माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मदतीने मला जिवे मारण्याचा हा कट रचला आहे. पुण्यात झालेल्या हल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली होती, तेव्हाही त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे राज्य सरकारचे ऐकतात असा आरोप केला होता.