TOD Marathi

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय.

संबंधित बातम्या

No Post Found

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाकडून नीट पीजीसाठी ओबीसी आणि ईडब्लूएस वर्गासंदर्भातील आरक्षणाबद्दलच्या पेचात सापडलेल्या नीट पीजी काउंसिलिंग प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. कोर्टाने असे म्हटले की, ओबीसी आणि ईडब्लूएस या दोन्ही श्रेणीसाठी आरक्षण लागू असणार आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज सकाळी हा निर्णय सुनावला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता नीट पीजी प्रकरणी सुप्राीम कोर्टातील सर्व पक्षांची मत ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपन्न यांनी याबद्दल निर्णय दिला. तर आता लवकरच काउंसिलिंगला सुरुवात होऊ शकते.

२०१९ साली केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नवी नियमावली आणली होती. या विधेयकात आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी किमान उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. तर ५ एकर कमाल जमिनीची मर्यादा होती. त्यावरही कोर्टात सुनावणी पार पडली असून यासंबंधी नवा ड्राफ्ट तयार करणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने मांडली आहे.